धोनीच्या गाडीचा पाठलाग करून "आराध्या"ने मिळवला सेल्फी

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचे करोडो चाहते आहेत. त्याला भेटायला मिळावं, त्याच्यासोबत एक फोटो काढायला मिळावा यासाठी धडपड करत असतात. धोनीच्या अशाच एका चाहतीने धोनीला भेटण्यासाठी चक्क स्कुटीवरुन त्याच्या गाडीचा पाठलाग केला. धोनीला भेटण्यासाठी तिने केलेला हा प्रयत्न वाया गेला नाही. धोनीने तिचं कौतुक करत तिच्यासोबत सेल्फीदेखील काढला. 

Updated: Nov 4, 2016, 09:44 PM IST
धोनीच्या गाडीचा पाठलाग करून "आराध्या"ने मिळवला सेल्फी title=

रांची : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचे करोडो चाहते आहेत. त्याला भेटायला मिळावं, त्याच्यासोबत एक फोटो काढायला मिळावा यासाठी धडपड करत असतात. धोनीच्या अशाच एका चाहतीने धोनीला भेटण्यासाठी चक्क स्कुटीवरुन त्याच्या गाडीचा पाठलाग केला. धोनीला भेटण्यासाठी तिने केलेला हा प्रयत्न वाया गेला नाही. धोनीने तिचं कौतुक करत तिच्यासोबत सेल्फीदेखील काढला. 
 
 न्यूझीलंडविरोधातील सामन्यासाठी रांचीमध्ये गेले असताना धोनीने आपल्या हमर कारने प्रवास केला होता. यावेळी आराध्याने धोनीला भेटण्याची चांगली संधी असल्याचं ओळखत स्कुटीवरुन त्याचा पाठलाग केला. धोनीने आपल्याकडे लक्ष द्यावं यासाठी तिने जोरजोरात धोनीचं नाव घेण्यास सुरुवात केली. धोनीचं लक्ष गेल्यावर त्याने सुरक्षारक्षकांना तिला सोडण्यास सांगितलं. धोनीने आराध्यासोबत सेल्फी काढण्यासही तयार झाला. यानंतर आराध्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. 
 
 धोनी अत्यंत नम्र असून सेलिब्रेटी असल्याचा त्याला अजिबात गर्व नसल्याचा अनुभव आराध्याने प्रसारमाध्यमांसोबत शेअर केला. आराध्याप्रमाणे अनेकजण कोणाचे तरी चाहते असतात, त्यांना भेटायची आपलीदेखील इच्छा असते, पण तसा प्रयत्न करत नाही. आराध्याच्या या स्टोरीमुळे इतरांमध्येही थोडी आशा निर्माण झाली असेलच.