रांची : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना रांचीमध्ये होतोय. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या होमग्राऊंडवर हा सामना होतोय. मात्र त्यानंतरही कदाचित धोनी हा सामना पाहू शकणार नाहीये.
डेक्कन क्रोनिकलच्या रिपोर्टनुसार झारखंड क्रिकेट टीमचा मॅनेजर पीएन सिंह यांनी हा खुलासा केलाय. कारण यादरम्यान धोनी विजय हजारे चषकासाठी संघाकडून खेळणार आहे. दिल्लीमध्ये धोनीच्या टीमचा सामना विदर्भविरुद्ध होतोय. समजा धोनीचा संघ सेमीफायनलमध्ये पोहोचल्यास त्यांचा सामना १७ मार्चला होणार आहे.
यादरम्यानच भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटी होतेय. १६ मार्चपासून या कसोटीला सुरुवात होतेय. या कारणामुळे धोनी कदाचित हा सिनेमा पाहू शकणार नाही.