मुंबई : क्रिकेटच्या मैदानावर क्रिकेटपटूंदरम्यान वाद होणे काही नवीन नाही. अनेकदा तर हे क्रिकेटपटू हमरीतुमरीवर येतात.
भारत आणि बांगलादेश सामन्यादरम्यान हा प्रकार घडला. रोहित शर्मा स्ट्राईवर असताना मुस्तफिझूर रेहमान गोलंदाजी करत होत. या चेंडूवर रोहित धाव काढण्यासाठी पळत असताना बांगलादेशच्या मुस्तफिझूर रेहमानने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. या चेंडूत युवराजला धाव घेता आली.
त्यानंतर जेव्हा धोनी आणि रैना पिचवर होते तेव्हा रेहमानने धोनीलाही धाव घेताना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र धोनीने त्या जोरात ढकलून दिले आणि धाव काढली.
मैदानात आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न करु नको नाहीतर चांगलाच धडा शिकवीन असेच काहीसे धोनीच्या कृतीतून त्यावेळी दिसून आले.