सीरिज जिंकल्यावर धोनीनं कोहलीला दिलं स्पेशल गिफ्ट

विराट कोहलीनं कर्णधारपद स्वीकारल्यावर पहिल्याच वनडे सीरिजमध्ये भारतानं इंग्लंडला 2-1नं धूळ चारली.

Updated: Jan 23, 2017, 05:07 PM IST
सीरिज जिंकल्यावर धोनीनं कोहलीला दिलं स्पेशल गिफ्ट  title=

मुंबई : विराट कोहलीनं कर्णधारपद स्वीकारल्यावर पहिल्याच वनडे सीरिजमध्ये भारतानं इंग्लंडला 2-1नं धूळ चारली. या विजयानंतर भारताचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनं विराट कोहलीला एक स्पेशल गिफ्ट दिलं आहे. दुसऱ्या वनडेमध्ये वापरण्यात आलेल्या बॉलवर सही करून धोनीनं कोहलीला दिली आहे.

धोनीनं दिलेलं हे गिफ्ट माझ्यासाठी अमूल्य असल्याचं विराट कोहली म्हणाला आहे. स्टम्प हे खूप महाग असतात आणि आयसीसी हल्ली स्टम्प घेऊन जायला परवानगी देत नसल्याचं कोहली म्हणाला.

धोनीनं मला त्याची सही असलेला बॉल दिला आणि तुझ्या कर्णधारपदाखाली जिंकलेली सीरिज कायम लक्षात राहिल असं म्हणाल्याची प्रतिक्रिया कोहलीनं दिली आहे.