धोनीवरील चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार

बहुचर्चित ‘एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी‘ हा हिंदी चित्रपट पुढील वर्षी २ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचा सर्वांत यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनीवरील हा चित्रपट नीरज पांडे दिग्दर्शित करत असून धोनीची भूमिका सुशांतसिंह राजपूत साकारणार आहे. 

Updated: Dec 28, 2015, 08:58 PM IST
धोनीवरील चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित होणार title=

मुंबई : बहुचर्चित ‘एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी‘ हा हिंदी चित्रपट पुढील वर्षी २ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचा सर्वांत यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनीवरील हा चित्रपट नीरज पांडे दिग्दर्शित करत असून धोनीची भूमिका सुशांतसिंह राजपूत साकारणार आहे. 

धोनीच्या वडिलांच्या भूमिकेत अनुपम खेर असणार आहेत. तर किआरा अडवानी, जॉन अब्राहम, श्रेयस तळपदे, फवाद खान यांच्याही या चित्रपटामध्ये भूमिका असतील.  

मुख्य भूमिकेतील सुशांतसिंह राजपूतनेच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख ‘ट्विटर‘वरून जाहीर केली. या चित्रपटाचे दिग्दर्शक नीरज पांडे यांनी यापूर्वी ‘अ वेनस्डे‘, ‘स्पेशल 26‘, ‘बेबी‘ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.