टेस्ट मॅचमध्ये सर्वाधिक सिक्सर्स मारणारे ५ फलंदाज

टेस्ट मॅचहा पाच दिवस खेळला जाणारा खेळ आहे. त्यामुळेच स्टेट मॅच खेळाडूना संयमाने खेळ करावा लागतो. तसेच फंलदाजाना ही खूप एकाग्रतेने खेळावे लागते. वन डे आणि टी-२० सारख्या झटपट क्रिकेट आल्यामुळे टेस्ट मॅचमध्ये फलंदाज आता अधिक जलद गतीने खेळू लागले आहेत.

Updated: Dec 15, 2015, 01:52 PM IST

मुंबई : टेस्ट मॅचहा पाच दिवस खेळला जाणारा खेळ आहे. त्यामुळेच स्टेट मॅच खेळाडूना संयमाने खेळ करावा लागतो. तसेच फंलदाजाना ही खूप एकाग्रतेने खेळावे लागते. वन डे आणि टी-२० सारख्या झटपट क्रिकेट आल्यामुळे टेस्ट मॅचमध्ये फलंदाज आता अधिक जलद गतीने खेळू लागले आहेत.

टेस्टमध्ये तुफानी फलंदाजीसाठी वीरेंद्र सेहवाग प्रसिद्ध आहे. त्यालाच बघून अनेक फलंदाजानी ही टेस्टमध्ये अधिक जलद धावा करण्याकडे भऱ दिला.

टेस्टमध्ये तुफानी फलंदाजी याआधी ही खेळली जायची मात्र ९० च्या शतकानंतर यांची जास्त क्रेज आली आणि टेस्टमध्ये देखील अधिक जलद गतीने रन होऊ लागले. टेस्ट क्रिकेटला १३० वर्षापूर्वीचा इतिहास आहे. मात्र फक्त दोनच फलंदाजानी आपल्या कारकीर्दीत सिक्सर्स मारण्यात शतक ठोकले आहे.

टेस्टमधील असेच ५ तुफानी फलंदाजी करणारे फलंदाज यांची सुरूवात खालच्या क्रमांकापासून करू.    

५ - वीरेंद्र सेहवाग (२००१-१३) - वीरूने जरी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी देखील क्रिकेटचे चाहते त्यांच्या विस्फोटक फलंदाजीला विसरू शकणार नाही. सेहवाग १०४ टेस्ट मॅच खेळल्या आहेत, त्यातील १८० डावात त्याने ९१ सिक्सर्स मारले. 

४- जॅक्स कॉलिस (१९९५-२०१३) - टेस्टमध्ये सर्वात अधिक सिक्सर्स मारण्यात चौथ्या क्रमांकावर आहे. दक्षिण अफ्रिकेचा जॅक्स कॉलिसन त्यांने १६६ टेस्ट मॅचमध्ये २८० डावात ९७ सिक्सर्स मारलेत.

 

३- क्रिस गेल (२०००-२०१५) - १०३ टेस्ट मॅच खेळला त्यातील १८२ डावात त्यांने ९८ सिक्सर्स मारले. सिक्सर्स मारण्याच्या शतकापासून फक्त २ सिक्सर्स लांब आहे.

२- ब्रॅन्डन मॅकलम (२००४-२०१५) - रविवारी डुनेडिनमध्ये श्रीलंकेविरूद्ध खेळताना दूसऱ्या डावात २ सिक्सर्स मारून सिक्सर्सचे शतक पूर्ण केले.

१- अॅडम गिलक्रिस्ट (१९९९-२००८) - टेस्ट मॅचमध्ये सर्वात पहिले सिक्सर्सचे शतक मारण्यात अॅडम गिलक्रिस्टचे नावे आहे. त्याने ९६ टेस्ट मॅच खेळल्या  त्यातील १३७ डावात त्यांने १०० सिक्सर्स मारले. त्यांने २००८ मध्ये हा रिकॉर्ड केला होता त्यानंतर ७ वर्षानी टेस्ट मॅचमध्ये सिक्सर्स मारण्याचे शतक झाले आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.