विशाखापट्टणम : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडनं 103 रनच्या मोबदल्यात पाच विकेट गमावल्या होत्या.
इंग्लंडचा कॅप्टन एलिस्टर कूकच्या विकेटचा व्हिडिओ मात्र व्हायरल होत आहे. मोहम्मद शमीच्या बॉलिंगवर कूक फक्त बोल्डच झाला नाही तर स्टम्पचे दोन तुकडे झाले. मोहम्मद शमीनं टाकलेल्या या बॉलचा स्पीड 142 किमी प्रतितास होता. शमीनं घेतलेल्या विकेटचा हा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे.