विशाखापट्टणम टेस्टमध्ये इंग्लंडची पडझड, निम्मा संघ तंबूत

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे.

Updated: Nov 18, 2016, 05:29 PM IST
विशाखापट्टणम टेस्टमध्ये इंग्लंडची पडझड, निम्मा संघ तंबूत  title=

विशाखापट्टणम : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारत मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडनं 103 रनवर पाच विकेट गमावल्या होत्या. पहिल्या इनिंगमध्ये इंग्लंडचा संघ अजूनही 352 रननं पिछाडीवर आहे.

आर.अश्विननं दोन तर शमी आणि जयंत यादवनं प्रत्येकी एक बॅट्समनला तंबूत पाठवलं. याआधी चार आऊट 317 अशी दुसऱ्या दिवसाची सुरुवात करणाऱ्या भारताला 455 रनपर्यंत मजल मारता आली.

पहिल्या दिवसाच्या शेवटी 151 रनवर नाबाद असणारा विराट कोहली 167 रनवर आऊट झाला, तर अश्विननं 58 रनची आणि कारकिर्दीतली पहिलीच टेस्ट खेळणाऱ्या जयंत यादवनं 35 रनची महत्त्वपूर्ण खेळी करून भारताला पहिल्या इनिंगमध्ये सन्मानजनक स्कोअरपर्यंत पोहोचवलं.