दुखापतीमुळे शामी इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत निर्भेळ यश मिळवल्यानंतर वनडे सामन्यांसाठी टीम इंडिया सज्ज झालीये. मात्र या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसलाय.

Updated: Dec 23, 2016, 11:28 AM IST
दुखापतीमुळे शामी इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर title=

नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत निर्भेळ यश मिळवल्यानंतर वनडे सामन्यांसाठी टीम इंडिया सज्ज झालीये. मात्र या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का बसलाय.

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी गुडघ्याच्या दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळू शकणार नाहीये. 

मोहाली कसोटीत शामीच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तो वानखेडे तसेच चेन्नईच्या मैदानावरही खेळू शकलेला नाही. अद्याप तो दुखापतीतून सावरला नसल्याने आगामी वनडे मालिकेतही तो खेळू शकणार नाहीये.

वऩडे संघात आता दुखापतग्रस्त शामीच्या जागी कोणाला संधी मिळणार आहे हे पहावे लागेल. दरम्यान, शामीच्या जागी इशांतला संधी देणार असल्याचे बोलले जातेय.