नवी दिल्ली : क्रिकेट एकिकडे 'फेम' मिळवून देणारा गेम... पण, एकदा का मागे पडलं तर एखाद्याला अंधारात ढकलून देणारा खेळही ठरतोय. असंच काहीसं घडलंय पाकिस्तानचा खेळाडू अरशद खान याच्यासोबत...
सध्या अरशद काय करतोय, हे समजल्यानंतर असं आम्ही का म्हणतोय हे तुम्हाला समजेल. अरशद सध्या ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये एक 'कॅब' चालवतोय...
अधिक वाचा - टीम इंडियाने तिसरी कसोटी जिंकत 22 वर्षानंतर मालिका जिंकली
अरशदनं आपल्य पहिल्याच वनडे मॅचमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा अलगद विकेट टिपला होता.
अरशदबद्दल हा खुलासा गणेश बिर्ले नावाच्या एका व्यक्तीनं केलाय. सिडनीत फिरताना बिर्ले ज्या कॅबमधून जात होते ती कॅब अरशद चालवत होता. हे लक्षात आल्यानंतर बिर्ले यांनी अरशदशी संवाद साधण्याचाही प्रयत्न केला पण, अरशदला मात्र आपली ओळख कुणालाही दाखवायची इच्छा नव्हती. सध्या आला दिवस ढकलण्यासाठी त्याच्यावर टॅक्सी चालवण्याची वेळ आलीय.
अधिक वाचा - ईशांत शर्माची सटकली, श्रीलंका खेळाडूंशी भिडला
अरशद पाकिस्तानच्या टीमकडून ९ टेस्ट आणि ५९ वन डे मॅच खेळल्यात. तसंच आयपीएलमध्येही तो हैदराबाद टीमकडून खेळलाय. अरशदच्या क्रिकेट करिअरचं आणखी एक वैशिष्ट्यं म्हमजे त्यानं आपली शेवटची टेस्ट आणि वन डे म२च भारताविरुद्ध खेळलीय. पण, वाढतं वय लक्षात घेता त्यानं क्रिकेटला 'अलविदा' केला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.