राजस्थान 'अजिंक्य', वॉटसनच्या साथीनं चेन्नईवर केली मात

कॅप्टन शेन वॉटसन आणि अजिंक्य रहाणच्या 'रॉयल' खेळीनं राजस्थाननं चेन्नई सुपर किंग्जवर आठ विकेट्सनी दणदणीत विजय मिळवलाय. या विजयासोबतच आयपीएलच्या यंदाच्या पर्वात सलग पाचव्या विजयाची नोंद राजस्थाननं केली आहे. चेन्नईचं १५७ रन्सचं लक्ष्य राजस्थाननं १८.२ ओव्हरमध्ये फक्त दोन विकेट गमावत सहजपणे गाठलं. 

Updated: Apr 19, 2015, 08:15 PM IST
राजस्थान 'अजिंक्य', वॉटसनच्या साथीनं चेन्नईवर केली मात title=

अहमदाबाद: कॅप्टन शेन वॉटसन आणि अजिंक्य रहाणच्या 'रॉयल' खेळीनं राजस्थाननं चेन्नई सुपर किंग्जवर आठ विकेट्सनी दणदणीत विजय मिळवलाय. या विजयासोबतच आयपीएलच्या यंदाच्या पर्वात सलग पाचव्या विजयाची नोंद राजस्थाननं केली आहे. चेन्नईचं १५७ रन्सचं लक्ष्य राजस्थाननं १८.२ ओव्हरमध्ये फक्त दोन विकेट गमावत सहजपणे गाठलं. 

आयपीएलमध्ये आज राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे तुल्यबळ संघ आमने सामने होते. चेन्नई सुपरकिंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र रॉयल्सच्या गोलंदाजांना चेन्नईचे आघाडीचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. सलामीवीर ब्रँडन मॅक्यूलम १२ रन्सवर माघारी परतला. तर सुरेश रैना, फाफ डू प्लेसिस आणि ड्वॅन स्मिथ ४० रन्सवर आऊट झाले. चेन्नईची अवस्था ४ आऊट ६५ अशी झाली होती. मात्र त्यानंतर ड्वॅन ब्राव्हो आणि महेंद्रसिंग धोनीने ९१ धावांची भागीदारी केल्यानं चेन्नईला १५६ धावांचा पल्ला गाठता आला. राजस्थानतर्फे जेम्स फॉल्कनर, ख्रिस मॉरिस, प्रवीण तांबे आणि अंकित शर्मा या चौघांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. 

चेन्नईचे १५६ रन्सचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या राजस्थानची सुरुवात दमदार झाली. दुखापतीतून सावरलेला शेन वॉटसन आणि अजिंक्य रहाणे ही जोडी सलामीला उतरली. या जोडीनं टीमला शतकी सलामी करुन संघाच्या विजयाचा पाया रचून दिला. या जोडीनं संघाला १४४ रन्सची सलामी करुन दिली. वॉटसन ४७ चेंडूत ७३ धावा करुन बाद झाला. तर स्टिव्ह स्मिथही सहा धावा करुन माघारी परतला. अजिंक्य रहाणेनं ५५ चेंडूत ७६ रन्सची नॉटआऊट खेळी केली. या खेळीसाठी त्याला मॅच ऑफ द मॅच पुरस्कार देण्यात आला. अजिंक्य रहाणे यंदाच्या पर्वात ५ मॅचमध्ये २३१ रन्स केले असून सध्या ऑरेंज कॅप रहाणेकडे आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.