रोहित आज लग्नबंधनात अडकणार, मुकेश अंबानींनी दिली ग्रँड पार्टी

भारताचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा आज लग्नबंधनात अडकणार आहे. शुक्रवारी रोहित शर्मा आणि रितीका सचदेव यांच्या लग्नाआधी प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी आपल्या ग्रँड पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. 

Updated: Dec 13, 2015, 09:01 AM IST
रोहित आज लग्नबंधनात अडकणार, मुकेश अंबानींनी दिली ग्रँड पार्टी title=

नवी दिल्ली : भारताचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा आज लग्नबंधनात अडकणार आहे. शुक्रवारी रोहित शर्मा आणि रितीका सचदेव यांच्या लग्नाआधी प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी आपल्या ग्रँड पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. 

अंबांनीच्या पार्टीत अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी हजेरी लावली होती. यात बॉलीवूड किंग खान शाहरुख खान, आदित्य रॉय कपूर सह अनेक बॉलीवूड कलाकार उपस्थित होते.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारताचा क्रिकेटपटू सुरेश रैना, बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट, अभिनेता जॉन अब्राहम, शिखर धवन, आदित्य रॉय कपूर, अजिंक्य रहाणे आणि त्याची पत्नी राधिका, राजकुमार हिरानी, अनिल कुंबळे, सुनील शेट्टी, अक्षय कुमार, ऐश्वर्या, अभिषेक बच्चन, आमिर खान, किरण राव, हरभजन सिंग आणि पत्नी गीता बसराही उपस्थित होते

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.