व्हिडिओ: पाहा विराट कोहली, ख्रिस गेलचा 'भांगडा'

कॅरेबियन बॅट्समन ख्रिस गेलला डांस करतांना आपण अनेकदा पाहिलंय. पण त्याला भांगडा करतांना पाहिलं? रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं शनिवारी आपल्या होम ग्राऊंडवर कोलकाता नाइट रायडर्सचा पराभव करून शानदार विजय मिळवला. 

Updated: May 3, 2015, 01:53 PM IST
व्हिडिओ: पाहा विराट कोहली, ख्रिस गेलचा 'भांगडा' title=

मुंबई: कॅरेबियन बॅट्समन ख्रिस गेलला डांस करतांना आपण अनेकदा पाहिलंय. पण त्याला भांगडा करतांना पाहिलं? रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं शनिवारी आपल्या होम ग्राऊंडवर कोलकाता नाइट रायडर्सचा पराभव करून शानदार विजय मिळवला. 

विजयाचा शिल्पकार मनदीप सिंह आणि कॅप्टन विराट कोहलीसोबत ख्रिस गेलनं दमदार भांगडा केला. 

मॅचनंतर संपूर्ण टीम ड्रेसिंग रूममध्ये आपल्या विजयाचा आनंद साजरा करत होती. मनदीप आणि ख्रिस गेलनं डांस केला आणि नंतर विराट कोहलीनंही त्यांना जॉईन केलं. या तिघांनी मस्त भांगडा केला. सीन अॅबॉटनं त्यांच्या डांसचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केलाय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.