अनेक जण नंग्या तलवारी घेऊन माझ्यासाठी उभे असतात : धोनी

 दक्षिण आफ्रिकेविरूद्ध दुसऱ्या वन डे सामान्यात नाबाद ९२ धावा करून लय गवसलेल्या भारतीय कर्णधार महेंद्र सिंग धोनीने वनडे कर्णधारपदावरून...

Updated: Oct 15, 2015, 11:54 AM IST
अनेक जण नंग्या तलवारी घेऊन माझ्यासाठी उभे असतात :  धोनी title=

इंदूर :  दक्षिण आफ्रिकेविरूद्ध दुसऱ्या वन डे सामान्यात नाबाद ९२ धावा करून लय गवसलेल्या भारतीय कर्णधार महेंद्र सिंग धोनीने वनडे कर्णधारपदावरून काढण्याची मागणी करणाऱ्यांना धारेवर धरले आहे. काही जण नंगी तलवार घेऊन वाट पाहत आहेत, त्यांना वाटतं तुम्ही चूक कराल आणि... 

लगोपाठ पराभव आणि खराब फॉर्मशी झगटणाऱ्या धोनीने या सामन्यात ८६ चेंडूत ९२ धावांची खेळी केली त्यामुळे भारताला २२ धावांनी विजय मिळाला. 

जिंकल्यानंतर पत्रकारांशी बोलताना धोनी म्हणाला, हा साधा खेळ नाही आहे. अनेक जण नंग्या तलवारी घेऊन उभे असतात, तुम्ही चुकी कराल आणि ते मजा घेतील. तो म्हणाला, आज मॅच चांगली झाली. काही विकेट स्वस्तात गेले आणि आमचा स्कोअर चांगला नव्हता. गोलंदाजीतही आमची चांगली सुरूवात केली नाही. पण स्पिनर्सने चांगली कामगिरी केली. अखेरच्या काही षटकात जलद गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. टीमच्या कामगिरीवर संपूर्ण संतुष्ट नसल्याचेही त्याने यावेळी सांगितले, लगोपाठ पराभवांनंतर जिंकणे चांगले वाटते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.