बीसीसीआयच्या तंबीनंतर लोकेशने तो फोटो केला डिलीट

सध्या भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेलाय. नवनियुक्त प्रशिक्षक अनिल कुंबळेसह भारतीय क्रिकेटर वेस्ट इंडिजमध्ये खेळासोबतच मजामस्तीही करतायत.

Updated: Jul 18, 2016, 12:57 PM IST
बीसीसीआयच्या तंबीनंतर लोकेशने तो फोटो केला डिलीट title=

नवी दिल्ली : सध्या भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेलाय. नवनियुक्त प्रशिक्षक अनिल कुंबळेसह भारतीय क्रिकेटर वेस्ट इंडिजमध्ये खेळासोबतच मजामस्तीही करतायत.

यावेळी तिथे करत असलेल्या मौजमजेचे फोटो क्रिकेटर नेहमी चाहत्यांसोबत शेअर करत असतात. असाच काहीसा फोटो भारताचा क्रिकेटपटू लोकेश राहुलने ट्विटरवर शेअर केला. मात्र हा फोटोने त्याला चांगलेच अडचणीत आणले.

लोकेशच्या हातात बीअरची बॉटल असलेला तो फोटो त्याने शेअर केला होता. मात्र या फोटोवरुन त्याच्यावर चांगलीच टीका होतेय. याप्रकऱणी बीसीसीआयने नाराजी व्यक्त करत अशा प्रकारचे फोटो टाकून तुम्ही तरुण मुलांना चुकीचे मेसेज देताय. अनेक तरुण मुले तुम्हाला फॉलो करत असतात. त्यामुळे त्यांना कोणताही चुकीचा मेसेज जाणार नाही याची काळजी घ्या अशी तंबीच बीसीसीआयने दिलीये.

फोटोवर टीका झाल्यानंतर राहुलने तो फोटो ट्विटरवरुन डिलीट केलाय. येत्या २१ जुलैपासून भारताची वेस्ट इंडिजविरुद्ध पहिली कसोटी सुरु होतेय.