शोएबवरचा ७० लाखांचा दंड आणि पाच वर्ष बॅन करण्याचा निर्णय रद्द

 पाकिस्तानचा माजी गोलंदाज आणि कमेंटेटर शोएब अख्तर याला लाहोर हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळालाय. 

Updated: May 21, 2015, 02:52 PM IST
शोएबवरचा ७० लाखांचा दंड आणि पाच वर्ष बॅन करण्याचा निर्णय रद्द  title=

इस्लामाबाद  :  पाकिस्तानचा माजी गोलंदाज आणि कमेंटेटर शोएब अख्तर याला लाहोर हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळालाय. 

कोर्टानं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (पीसीबी)  आदेशाला रद्द करण्याचे आदेश दिलेत. पीसीबीनं शोएबवर ७० लाखांचा दंड आणि पाच वर्षांची बंदी आणण्याचा निर्णय घेतला होता. 

९ फेब्रुवारी २००८ मध्ये पाकिस्तानी वर्तमानपत्र 'द डॉन'मध्ये एक लेख छापून आला होता. यामध्ये शोएबनं पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर कडक शब्दांत टीका केली होती. यावर ११ फेब्रुवारी रोजी बोर्डाकडून शोएबला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. 

या नोटीशीला शोएबनं १६ फेब्रुवारी २००८ रोजी उत्तर दिलं होतं. परंतु, २४ मार्च २००८ रोजी पुन्हा एकदा शोएबला एक नोटीस मिळाली. यामध्ये त्याला कमिटीपुढे हजर राहण्याचे आदेश देण्यात आलं. त्याप्रमाणे, १ एप्रिल २००८ रोजी शोएब कमिटीसमोर हजरही झाला.

पण, याच दिवशी कमिटीनं शोएबवर पाच वर्षांची बंदी घातली तसंच पाकिस्तानात कोणत्याही स्तरावर खेळण्यास बंदी केली. 

याविरुद्ध शोएबनं ट्रिब्युनलमध्ये याचिका दाखल केली. या ट्रिब्युनलनं त्याच्यावरची बंदी कमी करत दीड वर्ष केली. परंतु, त्याच्यावर ७० लाखांचा दंड मात्र कायम राहिला.

या निर्णयाविरुद्ध अखेर शोएबनं कोर्टाकडे दाद मागितली. लाहोर हायकोर्टानं यावर नुकताच निर्णय सुनावलाय. शोएबला जी शिक्षा सुनावण्यात आलीय त्याची कोणतीही घटनात्मक वैधता नसल्याचं सांगत कोर्टानं ही शिक्षाच रद्द केलीय. 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.