बिग फाईट : लिओनेल मेसी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो एकमेकांसमोर!

रिअल माद्रिद विरुद्ध बार्सिलोना यांच्यातील मोस्ट अवेटेड मुकाबला चाहत्यांना अनुभवायला मिळणार आहे... लिओनेल मेसी विरुद्ध ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्यातील मैदानावरील बिग फाईटचा आनंद या निमित्तानं फुटबॉल चाहत्यांना लुटता येईल.... 

Updated: Nov 21, 2015, 07:30 PM IST
बिग फाईट : लिओनेल मेसी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो एकमेकांसमोर! title=

मुंबई : रिअल माद्रिद विरुद्ध बार्सिलोना यांच्यातील मोस्ट अवेटेड मुकाबला चाहत्यांना अनुभवायला मिळणार आहे... लिओनेल मेसी विरुद्ध ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्यातील मैदानावरील बिग फाईटचा आनंद या निमित्तानं फुटबॉल चाहत्यांना लुटता येईल.... 

सॅन्तियागोच्या बर्नाब्यू स्टेडियमवर लिओनेल मेसीच्या 'बार्सिलोना' आणि  ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या 'रिअल माद्रिद'मध्ये महामुकाबला रंगणार आहे.... जगभरातील फुटबॉलप्रेमींना या  सपुरहिट मुकबाल्याबाबत  कमालीची उत्सुकता आहे.

एकतर दुखापतीतून सावरत लिओनेल मेसी फिट असल्यास या लढतीसाठी मैदानावर उतरणार आहे. त्याचप्रमाणे फ्रान्समधील स्टेडियमबाहेरील  स्फोटानंतर या मॅचसाठी कमालीची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ला-लीगामधील हे कट्टर प्रतिस्पर्धी  आमन-सामने येणार आहेत. दोन्ही टीम्समध्ये स्टार फुटबॉलर्सचा भरणा आहे. त्यातच लिओनेल मेसी विरुद्ध ख्रिस्तियानो रोनालडो या दोन फुटबॉल प्लेअर्सचं ख-या अर्थानं या मॅचमध्ये सेंटर ऑफ अट्रॅक्शन असणार आहेत. 

दुखापतीनंतर कमबॅक करणारा मेसी त्याचा जोशात आपल्या टीमसाठी मॅचविनर ठरेल का? हा एक प्रश्नच आहे. त्याचप्रमाणे गेल्या काही मॅचेसमध्ये रोनाल्डोलाही गोल झळकावता आलेला नाही. त्यामुळे माद्रिदसाठी तो एक चिंतेचा विषय आहे. या दोन मॅचविनर्स व्यतिरिक्त दोन्ही टीम्समध्ये अनेक टॅलेंटेड प्लेअर्स आहेत. त्यामुळे या महामुकाबल्याचा मॅचविनर कोण ठरतो आणि कोणती टीम अखेर यात बाजी मारते याकडे फुटबॉल चाहत्यांचं लक्ष असेल.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.