नामिबिया : क्रिकेट खेळताना मैदानावर ब्रेन स्ट्रोकचा त्रास झाल्याने नामिबियाच्या २५ वर्षीय रेमंड वॅन स्कूर कोसळला होता. त्यानंतर तो कोमात गेला. त्याचे शुक्रवारी निधन झाले.
गेल्या रविवारी देशांतर्गत क्रिकेट सामन्यादरम्यान रेमंडला ब्रेन स्ट्रोकचा त्रास झाला. फ्री स्टेटविरुद्धच्या सामन्यादरम्यान रेमंड ३५व्या षटकांत फलंदाजीस आला. त्याने १६चेंडूत १५ रन्स बनवले. ४३वे षटक संपल्यानंतर त्याला डोकेदुखीचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्याने पिण्यासाठी पाणी मागितले. मात्र दोन घोट पाणी प्यायल्यानंतर लगेचच रेमंड चक्कर येऊन पिचवर कोसळला. रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्याला ब्रेन स्ट्रोकचा त्रास झाल्याचे स्पष्ट झाले. तेव्हापासून तो कोमामध्ये होता. अखेर शुक्रवारी रात्री त्याची प्राणज्योत मालवली.
रेमंडच्या निधनाने संपूर्ण क्रिकेटजगतात हळहळ व्यक्त केली जात आहे. आयसीसीनेही रेमंडच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले. रेमंडच्या मृत्यूमुळे क्रिकेटचे नुकसान झाल्याची भावना आयसीसीने यावेळी व्यक्त केली. दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू एबी डेविलियर्सनेही रेमंडला श्रद्धांजली वाहिली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.