संगकारने रचला इतिहास, सलग तिसरी सेंच्युरी

श्रीलंकेचा दिग्गज बॅट्समन कुमार संगकारने वर्ल्डकपमध्ये सलग तिसरी सेंच्युरी ठोकून नवा रेकॉर्ड स्थापन केलाय. वर्ल्डकरमध्ये सलग तिसरी सेंच्युरी ठोकणारा संगकारा एकमेव बॅट्समन ठरलाय. संगकारने सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर आज वर्ल्डकप २०१५च्या पूल-ए सामन्यात १०४ रन्सची दमदार खेळी खेळलीय. 

Updated: Mar 8, 2015, 06:28 PM IST
संगकारने रचला इतिहास, सलग तिसरी सेंच्युरी title=

सिडनी: श्रीलंकेचा दिग्गज बॅट्समन कुमार संगकारने वर्ल्डकपमध्ये सलग तिसरी सेंच्युरी ठोकून नवा रेकॉर्ड स्थापन केलाय. वर्ल्डकरमध्ये सलग तिसरी सेंच्युरी ठोकणारा संगकारा एकमेव बॅट्समन ठरलाय. संगकारने सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर आज वर्ल्डकप २०१५च्या पूल-ए सामन्यात १०४ रन्सची दमदार खेळी खेळलीय. 

पहिले बांग्लादेशविरुद्ध मेलबर्नमध्ये नॉटआऊट १०५ रन्स आणि इंग्लंड विरुद्ध वेलिंग्टनमध्ये नॉट आऊट ११७ रन्स केल्यानंतर आजची ही तिसरी सेंच्युरी.

वर्ल्डकपमध्ये सलग तीन मॅचमध्ये आतापर्यंत कोणत्याही खेळाडूने सेंच्युरी केली नव्हती. मात्र वनडे मॅचमध्ये आतापर्यंत एकूण सहा वेळा असा कारनामा झालेला आहे. सर्वात आधी पाकिस्तानच्या झहीर अब्बास (१९८२,१९८३) यांनी भारताविरुद्ध हा रेकॉर्ड केला होता. त्यानंतर १९९३ मध्ये पाकिस्तानच्याच सईद अनवरने श्रीलंका विरुद्ध दोन आणि वेस्ट इंडिज विरुद्ध एक अशा सलग तीन सेंच्युरी ठोकल्या होत्या. 

दक्षिण आफ्रिकेच्या हर्शेल गिब्सने२००२मध्ये हा कारनामा करण्यात यश मिळवलं. गिब्सनंतर दक्षिण आफ्रिकेच्याच एबी डी विलियर्सने २०१०मध्ये ही कामगिरी केली. याच टीमच्या क्विटन डी कॉकने २०१३मध्ये भारताविरुद्ध सलग तीन मॅचमध्ये सेंच्युरी केली होती. तर २०१४मध्ये न्यूझिलंडच्या रॉस टेलरनेही कारनामा केलाय. 

आपल्या सेच्युरीदरम्यान संगकाराने त्याचे वनडे क्रिकेटमधील १४ हजार रन्सही पूर्ण केले आहेत. असा करणारा तो जगातिल दुसरा आणि श्रीलंकेचा पहिला खेळाडू बनलाय. संगकारने आतापर्यंत वनडे मॅचमध्ये १४,०६५ रन्स केले. वनडे मध्ये सर्वाधिक रन्स करण्याचा रेकॉर्ड भारताच्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या (१८,४२६) नावे आहे.  तसंच कुमार संगकारा सचिनच्या सर्वाधिक हाफसेंच्युरीच्या रेकॉर्डच्याही जवळ आलाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.