कोहलीने अशी केली ५२ वर्षांपूर्वीच्या रेकॉर्डची बरोबरी

चौथ्या टेस्ट मॅचमध्ये लोकल बॉय वीरेंद्र सेहवागने आंतरराष्ट्रीय आणि भारतीय क्रिकेटमधील अमूल्य योगदानासाठी कोटलाच्या मैदानात सम्मान करण्यात आला, तेथेच दुसरा लोकल बॉय आपल्या घरातील मैदानात टीम इंडियाच्या टेस्ट मॅचमध्ये टीमच नेतृत्व करत होता.

Updated: Dec 4, 2015, 05:36 PM IST
कोहलीने अशी केली ५२ वर्षांपूर्वीच्या रेकॉर्डची बरोबरी title=

कोटला : चौथ्या टेस्ट मॅचमध्ये लोकल बॉय वीरेंद्र सेहवागने आंतरराष्ट्रीय आणि भारतीय क्रिकेटमधील अमूल्य योगदानासाठी कोटलाच्या मैदानात सम्मान करण्यात आला, तेथेच दुसरा लोकल बॉय आपल्या घरातील मैदानात टीम इंडियाच्या टेस्ट मॅचमध्ये टीमच नेतृत्व करत होता.

एका वर्षापूर्वीच कॅप्टन बनल्यानंतर विराट कोहली भारतामध्ये पहिल्यांदाच टेस्ट मॅचचे नेतृत्व करत आहे. पहिल्या टेस्ट मॅच सिरिजमध्ये २-० अशी आघाडी मिळाली आहे.

तशीच आणखी एक आश्चर्य वाटणारी घटना घडली आहे.

सलग चार वेळा टॉस जिंकला कोहली
फिरोजशाह कोटला टेस्ट मॅच सुरू होण्याआधी विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेसोबत सतत चार वेळा टॉस जिंकला आहे. फिरोजशाह कोटलामध्ये या आधी खेळण्यात आलेल्या २२ टेस्ट मॅचमध्ये टॉस जिंकलेल्या टीमने प्रथम फलंदाजी केली आहे.  टॉस जिंकल्यानंतर विराट कोहलीने ही तोच निर्णय घेतला.

पतौडींशी विराटची बरोबरी
विराट कोहलीने ४ वेळा टॉस जिंकण्यासोबतच ५२ वर्षापू्र्वीचा मन्सूर अली खान पतौडी यांनी १९६३-६४ मॅचच्या ५ मॅचेसच्या सिरिजमध्ये ४ वेळा टॉस जिंकण्याचा पराक्रमची बरोबरी केली आहे.

कॅप्टन कोहलीने या मॅचमध्ये ४४ रन केले आणि कॅच आऊट झाला.

विराटच्या जन्मापासून भारत हारला नाही कोटलावर
विराटच्या जन्मानंतर टीम इंडिया फिरोजशाहवर खेळल्या गेलेल्या एकाही मॅचमध्ये हारलेली नाही. ५ नोव्हेंबर १९८८ कोहलीचा जन्म झाला. नोव्हेंबर १९८७ ला टीम इंडिया वेस्ट इंडिज सोबत शेवटची टेस्ट मॅच हारली होती.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.