वनडेत मेहबूबने घेतल्या होत्या १० विकेट

क्रिकेटमध्ये दरवेळी नवनवे रेकॉर्ड बनत असतात. याच दिवशी २००८ मध्ये नेपाळचा क्रिकेटर मेहबूब आलमने नवा रेकॉर्ड बनवत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव सामील केले होते. आयसीसीच्या अधिकारिक वनडेमध्ये सर्वच्या सर्व म्हणजेच १० विकेट घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला होता. 

Updated: Dec 4, 2015, 04:32 PM IST
वनडेत मेहबूबने घेतल्या होत्या १० विकेट title=

नवी दिल्ली : क्रिकेटमध्ये दरवेळी नवनवे रेकॉर्ड बनत असतात. याच दिवशी २००८ मध्ये नेपाळचा क्रिकेटर मेहबूब आलमने नवा रेकॉर्ड बनवत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव सामील केले होते. आयसीसीच्या अधिकारिक वनडेमध्ये सर्वच्या सर्व म्हणजेच १० विकेट घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला होता. 

मोझाम्बिकविरुद्ध सामन्यात त्याने हा रेकॉर्ड केला. या सामन्यात नेपाळने पहिल्यांदा फलंदाजी करताना ५० ओव्हरमध्ये सात विकेट गमावत २८३ धावा केल्या होत्या. त्यानंतर मोझाम्बिक फलंदाजीस उतरला. 

पहिल्या षटकांत मोझाम्बिक संघाने एकही विकेट गमावली नाही. त्यानंतर मात्र मेहबूबने भेदक मारा करताना प्रतिस्पर्धी संघाची दाणादाण उडवून दिली. एकापाठोपाठ एक विकेट घेत मेहबूबने मोझाम्बिकाचा अवघा डाव १९ धावांत संपुष्टात आणला. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.