कोहली ठरला टी-२०मध्ये नं. १

मुंबई : टी २० क्रिकेट विश्वात ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीवर क्लिन स्वीपची चव देणारा क्रिकेटर विराट कोहली पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.

Updated: Feb 1, 2016, 05:19 PM IST
कोहली ठरला टी-२०मध्ये नं. १  title=

मुंबई : टी २० क्रिकेट विश्वात ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीवर क्लिन स्वीपची चव देणारा क्रिकेटर विराट कोहली पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. या स्थानावर आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियाचा अॅरॉन फिच होता. त्याला या स्थानावरुन हटवून विराटने हे स्थान काबिज केलंय.

 

ICC च्या ताज्या रँकिंगनुसार कोहलीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध केलेल्या टी२० मालिकेत नाबाद ९०, नाबाद ५९ आणि ५० रन्सची खेळी केल्याने त्याला ४७ रेटींग पॉईंटचा फायदा मिळाला आहे. त्यामुळे विराटच्या पॉईंट्सची संख्या ८९२ झाल्यामुळे तो आता पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. तर अॅरॉन फिचर आता ८६८ पॉईंट्ससोबत दुसऱ्या स्थानावर आहे. 

याच मालिकेत भारताने ३-० असा विजय मिळवला होता आणि कोहलीने 'मॅन ऑफ द सिरीज' हा किताबही मिळाला होता.