कबड्डी : पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारत विश्व चॅम्पियन

भारताने कबड्डी वर्ल्ड कप २०१४ च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानवर ४५ - ४२ ने मात करत सलग पाचव्यांदा कबड्डी विश्व कपवर आपले नाव कोरले.

Updated: Dec 20, 2014, 10:03 PM IST
कबड्डी : पाकिस्तानचा धुव्वा उडवत भारत विश्व चॅम्पियन  title=

मुक्तसर : भारताने कबड्डी वर्ल्ड कप २०१४ च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानवर ४५ - ४२ ने मात करत सलग पाचव्यांदा कबड्डी विश्व कपवर आपले नाव कोरले.

भारतीय संघाने सलग पाचव्यांदा तर महिला संघाने सलग चौथ्यांदा कब्बडी विश्वचषक जिंकला. पंजाबमध्ये मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांच्या गावात बांधण्यात आलेल्या नव्या स्टेडिअमवर कबड्डीचा अंतिम सामना खेळवण्यात आला.

पुरुष गटात अंतिम सामन्यात कांटे की टक्कर पाहायला मिळाली. पाकिस्तानने सुरुवातीला चांगला खेळ केला.भारतावर आघाडी घेऊन वर्चस्व ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय खेळाडूंनी शेवटच्या क्षणात आपला खेळ उंचावला आणि सामन्यावर आपली पक्कड मजबूत केली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.