श्रीकांतसमोर लीन डॅनचे मोठे आव्हान

बॅडमिंटनमध्ये श्रीकांतला सेमी फायनल गाठण्यासाठी लीन डॅनशी समाना करावा लागणार आहे. 

Updated: Aug 17, 2016, 12:37 PM IST
श्रीकांतसमोर लीन डॅनचे मोठे आव्हान title=

रिओ : बॅडमिंटनमध्ये श्रीकांतला सेमी फायनल गाठण्यासाठी लीन डॅनशी समाना करावा लागणार आहे. 

श्रीकांतनं यापूर्वी लीन डॅनला चायना ओपनमध्ये यापूर्वी पराभूत कऱण्याची किमया साधली होती. त्यामुळे श्रीकांतला या मॅचमध्ये कमी लेखून चालणार आहे. 

मात्र, लीन डॅननं यापूर्वी बीजिंग आणि लंडन ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडलला गवसणी घातलीय. तर पाच वेळा वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि सहा वेळा ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिपही त्यानं जिकंली आहे. त्यामुळे श्रीकांतला त्याच्यापासून सावध रहाव लागेल. 

सिंधूनं सेमी फायनल गाठत बॅडमिंटनमध्ये मेडलच्या आशा जिवंत ठेवल्यात. आता श्रीकांतकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.