मुंबई-पुणे सामन्यावरुन सोशल मीडियावर जोक्सचा महापूर

आज आयपीएलच्या अंतिम सामन्यात मुंबई आणि पुणे हे दोन संघ आमनेसामने येतायत. 

Updated: May 21, 2017, 05:56 PM IST
मुंबई-पुणे सामन्यावरुन सोशल मीडियावर जोक्सचा महापूर title=

मुंबई  : आज आयपीएलच्या अंतिम सामन्यात मुंबई आणि पुणे हे दोन संघ आमनेसामने येतायत. 

दोन्ही संघ महाराष्ट्रात असले तरी प्रत्येक संघाच्या चाहत्याला आपल्याच संघाने जिंकावे असे वाटते. या सामन्यावरुन सोशल मीडियावर जोक्स चांगलेच व्हायरल होतायत. व्हायरल जोक्सपैकी काही निवडक जोक्स...

 

कमिटीच्या दोन्ही टिम  फायनलला खेळवायच्या होत्या तर आम्हाला एवढया लांबनं कशाला बोलवलं.
.
.
.
.
वॉर्नर, मँक्सवेल
------
Dear IPL fans in MAHARASHTRA 

      मुंबई-पुण्याच्या MATCH ला आपण आतापर्यंत लय भांडलो. महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक शहर(पुणे) आणि एक स्वप्नांची नगरी(मुंबई).....अंतिम फेरी कुणीही जिंकूदे पण कृपया करून या दोन शहरांवरून कोणतेही विनोद करू नका...शेवटी विजय हा आपल्या महाराष्ट्राचाच असणार आहे......

#जय_महाराष्ट्र 

 

 

 

 

तरी पण मुंबईच जिंकणार
------
शिकावं तर मुंबई इंडियन्स कडून,
स्वतः पण  Qualify झाली.. 
आणि पुणे बरोबर 2वेळा हरून
त्यांना Qualify होण्यास मदत केली...
आणी आता तर पुण्याला फायनल पुढे पाठवून स्वतः मागून फायनल पोचली
भावकी कशी जपावी ते मुंबई कडून शिकावे

जय हो 
मुंबईindians

आता 21 ला विजय तर महाराष्ट्राचा होणार
टीप : खेळाला प्रोसान द्या खुन्नस तर 4 जून ला पाकिस्तान ला द्यायची आहे
जय महाराष्ट्र
------
आज खरी स्पर्धा गणपतीची !!
IPL Final 

दगड़ू सेठ vs सिद्धिविनायक