अरेरे! फोन-मॅसेजचं उत्तर दिलं नाही म्हणून इशांत शर्मा टीममधून बाहेर

दिल्लीनं आगामी घरगुती सत्रात आपल्या रणजी टीममध्ये आतंरराष्ट्रीय फास्ट बॉलर इशांत शर्माला घेतलं नाहीय. दिल्लीच्या निवडकर्त्यांच्या फोन आणि मॅसेजला उत्तर दिलं नाही म्हणून इशांतला टीम बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला गेला.

Updated: Sep 24, 2015, 07:58 PM IST
अरेरे! फोन-मॅसेजचं उत्तर दिलं नाही म्हणून इशांत शर्मा टीममधून बाहेर title=

नवी दिल्ली: दिल्लीनं आगामी घरगुती सत्रात आपल्या रणजी टीममध्ये आतंरराष्ट्रीय फास्ट बॉलर इशांत शर्माला घेतलं नाहीय. दिल्लीच्या निवडकर्त्यांच्या फोन आणि मॅसेजला उत्तर दिलं नाही म्हणून इशांतला टीम बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला गेला.

वेबसाइट 'क्रिकइंफो डॉट कॉम'नं दिलेल्या बातमीनुसार दिल्लीच्या निवड समितीचे अध्यक्ष विनय लांबा यांनी सांगितलं की, 'इशांतनं आमचा फोन उचलला नाही आणि टेक्स्ट मॅसेजचं उत्तरही दिलं नाही.'

नुकत्याच श्रीलंकेत झालेल्या टेस्ट सीरिज दरम्यान शानदार फॉर्ममध्ये असलेल्या इशांतची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आगामी घरगुती सीरिजसाठी वनडेच्या टीममध्ये पण सहभागी केलं गेलं नाहीय.

दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या टेस्ट सीरिज सुरू होईपर्यंत इशांत रणजीसाठी उपलब्ध होता. मात्र दिल्लीनं त्याला टीमबाहेर ठेवण्याचा निर्णय घेतलाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.