ब्रिस्बेन : ब्रिस्बेन टेस्टच्या तिसऱ्या दिवशी दुपारी लंचच्या वेळी भारतीय क्रिकेटर ईशांत शर्माला शाकाहारी जेवण न मिळाल्यानं त्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेटकडे नाराजगी व्यक्त केलीय.
ऑस्ट्रेलियात या लंच दरम्यान एकही भारतीय पदार्थ नसल्याने ईशांत शर्मानं जेवणच टाळलं. ईशांत ऑस्ट्रेलियाच्या या वागणुकीमुळे खूपच नाराज झाला आहे. हल्लीच अॅडिलेडमध्ये टीम भारतीय जेवणावर जाम खूश दिसली होती. कारण, या दरम्यान टिम इंडियासाठी भारतीय 'कूक'ची व्यवस्था करण्यात आली होती.
ईशांत शर्मासोबत सुरेश रैनादेखील चांगलं जेवण न मिळाल्यानं संतापला होता. ईशांतने आणि रैनाने मिळून या गोष्टींवर 'सीए'सोबत चर्चा केली.
यानंतर, या गोष्टीकडे गंभीरतेनं लक्ष दिलं जाईल, पुन्हा असा गैरव्यवहार होणार नाही, असे आश्वासन ऑस्ट्रेलियानं समितीनं दिलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.