मुंबई : रोईंग क्रीडा प्रकारात ऑलिंपिकसाठी पात्र ठरलेला दत्तू भोकनळला मदत करण्यास राज्य सरकारने नकार दिलाय. स्पर्धेतील तयारीसाठी देण्यात येणारी पाच लाखांची मदत देण्यास सरकारने नकार दिलाय.
गेल्या दोन महिन्यांपासून तो या मदतीची याचना करत आहे. मात्र क्रीडा मंत्रालयाने स्पष्ट शब्दात मदत न करण्याचा निर्णय कळवला आहे. या खेळाचे तज्ञ प्रशिक्षक भारतात नसल्याने तो सध्या अमेरिकेत प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतोय.
यासाठी कोट्यवधींचा खर्च असून त्याची सांपत्तिक स्थिती संपन्न नाहीये. लष्करात सैनिक असला तरी सरावासाठी आवश्यक असलेले साहित्य, खाजगी कोच फी, राहण्याचा खर्च सर्व शक्य होत नाहीये.
सरकारने मदत नाकारल्याने त्याला राहते हॉटेल सोडावे लागले आहे. अमेरिकेत एका गुजराथी कुटुंबाने त्याला त्यांच्या घरी ठेवून मदत केली आहे.