फक्त साडेसात रूपयात या क्रिकेटरने केला विवाह

सुरेश रैना, हरभजन सिंग आणि दिनेश कार्तिक यांच्यानंतर आणखी एका क्रिकेटर क्लिन बोल्ड झाला आहे. भारतीय टीममधील जलद गोलंदाज वरून अॅरॉन हा देखील आज विवाहबंधनात अडकला आहे. 

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 2, 2016, 07:30 PM IST
फक्त साडेसात रूपयात या क्रिकेटरने केला विवाह title=

नवी दिल्ली : सुरेश रैना, हरभजन सिंग आणि दिनेश कार्तिक यांच्यानंतर आणखी एका क्रिकेटर क्लिन बोल्ड झाला आहे. भारतीय टीममधील जलद गोलंदाज वरून अॅरॉन हा देखील आज विवाहबंधनात अडकला आहे. 

वरूण अॅरॉन याने त्याची लहानपणीची मैत्रीण रागिनी हिच्यासोबत ख्रिश्चन पद्धतीने जमशेदपूर येथे लग्न केलं. दोघेही जमशेदपूर येथील लोयाला कॉलेजमध्ये एकत्र शिकत होते.

मुळचा झारखंडमधील सिंहभूमचा असणारा वरुणने फक्त साडेसात रुपयमध्ये हे लग्न केलं. लग्नाचा अर्ज करण्यासाठी अडीच रुपये तर कोर्ट फी साठी वरूनला ५ रुपये खर्च आला. येत्या 4 फेब्रुवरीला दोघांच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी दिली जाणार आहे. अनेक दिग्गज खेळाडू या लग्नाला हजेरी लावतील असं म्हटलं जातंय. 

सध्या वरुण हा आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेविल्स कडून खेळतो आहे.