नवी दिल्ली : अंमलबजाणी संचलनालयानं आता आयपीएलच्या काळापैशाप्रकरणी ललित मोदींभोवती फास आवळायला सुरूवात केलीय. ललित मोदींना रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यासाठी ईडीनं तयारी सुरू केली आहे.
या नोटीसीसाठी मोदींच्या बँक खात्याविषयी सिंगापूर, ब्रिटन आणि मोरिशियस या तीन देशांकडून माहिती मागवली आहे. या माहितीच्या आधारे मोदींविरोधात लेटर रेग्युलेटरी प्रोसेस पूर्ण करून रेड कॉर्नर नोटीस जारी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ललित मोदींना मदत केल्याचा केंद्रीयमंत्री सुषमा स्वराज आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यावर आरोप आहे. ललित मोदींनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केली होती. आता त्यांनी सट्टेबाजाशी संबंध असणाऱ्या खेळाडूंचीच नावे जाहीर केली आहेत. गेल्या काही दिवसांपासून ललित मोदी विविध कारणांमुळे चर्चेत आहेत. आता त्यांनी हा नवा खुलासा केला आहे.
मोदींना नावे घेतलेली तिन्ही खेळाडू आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्जचे खेळाडू आहेत. ललित मोदींनी ट्विटरवरून म्हटले आहे, की क्रिकेटपटूंचे सट्टेबाजाशी संबंध असल्याच्या संशयावरून मी जून २०१३ मध्ये आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन यांना पत्र लिहिले होते. त्यावर त्यांना जे योग्य वाटते, ते करण्यास मी त्यांना सांगितले होते. सुरेश रैना, रवींद्र जडेजा आणि वेस्ट इंडीजच्या ड्वेन ब्राव्हो यांचे रियल इस्टेट क्षेत्रातील बाबा दिवान याच्याशी जवळचे संबंध आहे, असा खळबळजनक आरोप आयपीएल गैरव्यवहारातील फरारी आरोपी ललित मोदी यांनी केला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.