जखमी विराटला बंगळुरूत मिळालं गोड सरप्राईज!

सध्या आयपीएलमध्ये बिझी असलेल्या विराटला बंगळुरूमध्ये एक सरप्राईज मिळालं. 

Updated: Apr 12, 2017, 06:59 PM IST
जखमी विराटला बंगळुरूत मिळालं गोड सरप्राईज! title=

बंगळुरू : सध्या आयपीएलमध्ये बिझी असलेल्या विराटला बंगळुरूमध्ये एक सरप्राईज मिळालं. 

बॉलिवूड अभिनेत्री आणि विराटची गर्लफ्रेंड अनुष्का शर्मा हिनं बंगळुरूत जाऊन विराटला एक सरप्राईज भेट दिलीय. सध्या, जखमी असलेल्या विराटनं आयपीएलमध्ये खेळणं टाळलंय. 

AnushkaViratBangalore
विराट - अनुष्काचा व्हायरल फोटो

ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या चार टेस्ट मॅच सीरीजच्या तिसऱ्या मॅचमध्ये विराटच्या खांद्याला दुखापत झाली होती. यामुळेच तो धर्मशाळामध्ये खेळल्या गेलेल्या चौथ्या टेस्ट मॅचमध्येही खेळू शकला नव्हता. आयपीएलमध्ये त्याच्याऐवजी टीमची धुरा ऑस्ट्रेलियाचा ऑल राऊंडर खेळाडू शेन वॉटसनकडे सोपवण्यात आलीय. 

उल्लेखनीय म्हणजे, अनुष्का काल बंगळुरूला दाखल झाली आणि आज विराटनं आपल्या पदार्पणाची घोषणाही करून टाकलीय. १४ एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध होणाऱ्या मॅचमध्ये आपण खेळू शकू असा विश्वास विराटनं व्यक्त केलाय.