कस्टम अधिकऱ्यांनी केली आंतरराष्ट्रीय क्रिकेटरची बॅट खराब

Updated: Aug 9, 2014, 03:16 PM IST
कस्टम अधिकऱ्यांनी केली आंतरराष्ट्रीय क्रिकेटरची बॅट खराब title=

नवी दिल्लीः मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या वेस्ट इंडिजचा लिंडल सिमन्सला अमेरिकेच्या एअरपोर्टवर मनस्ताप सहन करावा लागला. एअरपोर्टवर तपासणी करताना सिमन्सच्या बॅटला कस्टम अधिकाऱ्यांनी चार ठिकाणी छिद्र पाडले, त्यामुळे सिमन्सला जबरदस्त राग आला. 

आयपीएल सातमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या सिमन्सने पहिले शतक लगावले होते. सिमन्स सीपीएलचा साथीदार आणि न्युझीलंडच्या स्टार प्लेअर जिम्मी निशमसोबत अमेरिकेच्या दौऱ्यावर होता. त्यावेळी हा प्रकार घडला. 

खराब झालेल्या बॅटचे फोटो निशमने ट्विट करताना म्हटले की, विचार करा तुमचे क्रिकेट कीट अमेरिकेला गेले असेल तर तपासणीच्या बहाण्याने त्यात छिद्रतर केले नाही ना. 

 

सिमन्सने या बॅटने सीपीएलमध्ये मागील मॅचमध्ये काही चांगली कामगिरी केली नाही. सहा चेंडूत एकही रन न बनवता पॅव्हेलियनमध्ये परतला. आता त्याला आपल्यासाठी नवी बॅट घ्यावी लागणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.