नवी दिल्ली: क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं. दररोज क्रिकेटच्या मैदानात काही न काही रेकॉर्ड बनत असतात आणि तुटतात. पण काही रेकॉर्ड असे आहेत जे कधीही तुटतील असं वाटत नाही. काहीसं असंच घडलं होतं एका मॅचमध्ये. पण त्याबाबतीत अजूनही संशय आहे.
आजच्या जवळपास 100 वर्षांपूर्वी क्रिकेटच्या मैदानात जे घडलं होतं ते आश्चर्यच... एका टीमनं मॅचच्या पहिल्याच बॉलवर 20-25 नाही तर तब्बल 286 रन्स बनवलेत. मात्र या मॅचचा काही ठोस पुरावा नाही. एक प्रसिद्ध इंग्रजी वर्तमानपत्र पाल मैल गॅझेटच्या 1894मध्ये छापलेल्या एका रिपोर्टमध्ये या मॅचबाबत लिहिलंय.
रिपोर्टनुसार विक्टोरिया आणि त्याची शेजारील टीमदरम्यान खेळल्या गेलेल्या मॅचमध्ये विक्टोरियाच्या सलामी बॅट्समननं इतका जोरदार शॉट मारला की बॉल बाउंड्री पार होण्याऐवजी मैदानातील झाडाच्या सर्वात उंच फांदीवर फसला. या दरम्यान दोन्ही बॅट्समन रन्स काढायला धावले. विरोधी टीमनं अंपायरला बॉल हरविल्याचा सिग्नल देण्यास सांगितलं. मात्र बॉल स्पष्टपणे फांदीवर दिसत होता. शेवटी अंपायरनं ग्राऊंड स्टाफला फांदी कापण्याचे आदेश दिले.
खूप प्रयत्नांनंतरही जेव्हा बॉल खाली पडला नाही. तेव्हा स्टाफनं रायफलमधून गोळ्या झाडल्या आणि बॉल खाली पडला. पण या वेळेत दोन्ही खेळाडूंनी 286 रन्स बनवले होते. बॉल मिळाल्यानंतर व्हिक्टोरियाच्या टीमनं आपला डाव घोषित केला.
एवढंच नव्हे तर या रिपोर्टनुसार व्हिक्टोरियाच्या टीमनं ही मॅच जिंकून एक वेगळाच रेकॉर्ड केला. मात्र या मॅचबद्दल काही ठोस पुरावा उपलब्ध नाहीय.
आता हे आपल्यावर आहे की आपण या मॅचच्या या इंग्रजी वर्तमानपत्रात आलेल्या बातमीवर विश्वास ठेवाल की, क्रिकेटची एक काल्पनिक कथा म्हणून सोडून द्याल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.