झिम्बाब्वे दौऱ्यात धोनीची कसोटी

शनिवारपासून भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्याला सुरुवात होत आहे. भारताच्या या दौऱ्यामध्ये 3 वनडे आणि 3 टी20 मॅच आहेत.

Updated: Jun 10, 2016, 08:27 PM IST
झिम्बाब्वे दौऱ्यात धोनीची कसोटी title=

हरारे : शनिवारपासून भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्याला सुरुवात होत आहे. भारताच्या या दौऱ्यामध्ये 3 वनडे आणि 3 टी20 मॅच आहेत. झिम्बाब्वे विरुद्धच्या या दौऱ्यामध्ये कॅप्टन महेंद्रसिंग धोनीची कसोटी लागणार आहे. 

धोनीबरोबर असलेली ही भारताची टीम नवखी आहे. या दौऱ्यामध्ये कोहली, रोहित शर्मा आणि सुरेश रैना यांच्यासारख्या दिग्गजांना विश्रांती देण्यात आली आहे. धोनीकडून कॅप्टन्सी काढून विराट कोहलीला टीमची जबाबदारी द्यावी, अशी मागणी होत आहे, त्यामुळे ही सिरीज भारतानं गमावली तर धोनीच्या अडचणींमध्ये आणखी भर पडू शकते. 

झिम्बाब्वे दौऱ्यात कोणाला संधी ?

एम.एस.धोनी(कॅप्टन), के.एल.राहुल, फैज फैजल, मनिष पांडे, करुण नायर, अंबाती रायडू, रिषी धवन, अक्सर पटेल, जयंत यादव, धवल कुलकर्णी, जसप्रीत बुमराह, बरिन्दर सरन, मनदीप सिंग, केदार जाधव, जयदेव उनादकट, युझुवेंद्र चहाल