मेलबर्न, ऑस्ट्रेलिया : मेलबर्न येथे २००६ मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत टेबल टेनिस खेळाडू दत्ता याचे घरातून गोल्ड मेडल चोरीला गेले. त्यामुळे त्याला धक्का बसलाय.
दत्ता याचे मुनी पाँड्स परीसरात घर असून १२ जानेवारी रोजी ही चोरी झाली. मी भारतीय मित्रांशी बोललो, त्यांनीही खेद व्यक्त केल्याचे दत्ताने म्हटले आहे. सुवर्णपदक जिंकणे हा अत्यानंदाचा भाग होता, पण ते पदक चोरीला जाणे फार त्रासदायक असल्याचे त्याने म्हटले आहे.
दत्ता आठव्या वर्षापासून टेबल टेनिस खेळत आहे. त्याचे प्रशिक्षक मेलबर्न येथील आहेत. चोराला मी एवढंच सांगेन, की तू फक्त सोने म्हणून ते चोरलेस, पण माझ्यासाठी त्याची किंमत खूप जास्त आहे, त्यामुळे तू मला ते परत दिलंस तर फार चांगलं होईल. माझ्यासाठी आणि माझ्या टीममधल्या सहकाऱ्यांच्या भावना त्या मेडलमध्ये असल्याचे त्याने म्हटलेय.
या पदकाबरोबरच अन्य मौल्यवान गोष्टींचीही चोरी करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाचे पोलीसही मेडलच्या चोरीमुळे चक्रावले असून त्यांचा तपास सुरू आहे.