तर अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये भारताचे दोन संघ

येत्या 27 जानेवारीपासून बांगलादेशमध्ये अंडर 19 क्रिकेट वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. या स्पर्धेसाठी भारताचा संघ बांगलादेशमध्ये दाखल झालाय. पण या स्पर्धेत भारताचे 2 संघ खेळू शकतात. 

Updated: Jan 22, 2016, 08:09 PM IST
तर अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये भारताचे दोन संघ title=

मुंबई :येत्या 27 जानेवारीपासून बांगलादेशमध्ये अंडर 19 क्रिकेट वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. या स्पर्धेसाठी भारताचा संघ बांगलादेशमध्ये दाखल झालाय. पण या स्पर्धेत भारताचे 2 संघ खेळू शकतात. 
या स्पर्धेत इतर संघांमधल्या भारतीय वंशाच्या खेळांडूंची संख्या पाहिली तर हे सहज शक्य आहे. 27 जानेवारी ते 14 फेब्रुवारीपर्यंत चालणा-या या स्पर्धेमध्ये एकूण 16 संघ सहभागी होतील. यामध्ये भारत, इंग्लंड, श्रीलंका, बांगलादेश, न्यूझिलंड, वेस्टइंडिज या संघांचा समावेश आहे.  

दुस-या देशांमधले भारतीय खेळाडू

अनिकेत पारिख- न्यूझिलंड
रचिन रविंद्र- न्यूझिलंड
वरुण चोपडा- आयर्लंड
अर्जुन नायर- ऑस्ट्रेलिया
कर्स्टन कालीचरण- वेस्ट इंडिज
अक्षय पटेल- झिम्बाब्वे
आकाश गिल- कॅनडा
ममिक लूथरा- कॅनडा
मिराज पटेल- कॅनडा
श्लोक पटेल - कॅनडा
हर्ष ठाकर- कॅनडा