भारतीय महिला संघाचं आव्हान संपुष्टात

टी-२० वर्ल्डकप २०१६ च्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज महिला सामन्यामध्ये भारताचा पराभव झालाय. भारतीय महिला खेळाडूनी आजची मॅच ही खूप कमी फरकाने गमावली. भारतीय महिला संघाला आजच्या मॅचमध्ये ही ३ रन्सने पराभव स्विकारावा लागला.

Updated: Mar 27, 2016, 06:55 PM IST
भारतीय महिला संघाचं आव्हान संपुष्टात title=

मुंबई : टी-२० वर्ल्डकप २०१६ च्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज महिला सामन्यामध्ये भारताचा पराभव झालाय. भारतीय महिला खेळाडूनी आजची मॅच ही खूप कमी फरकाने गमावली. भारतीय महिला संघाला आजच्या मॅचमध्ये ही ३ रन्सने पराभव स्विकारावा लागला.

भारतीय महिला संघाकडून अनुजा पाटील हिने सर्वाधिक २६ रन्स केले तर वेस्ट इंडिजकडून टेलर हिने सर्वाधिक ४७ रन्स केले. अनुजा पाटील हिने ३ तर कौर हिने ४ विकेट्स घेतले. वेस्ट इंडिजच्या डोटेन हिने ३ विकेट्स घेतले.

आजच्या पराभवानंतर भारतीय महिला संघाचं वर्ल्डकप टी-२० २०१६ मधलं आव्हान संपूष्टात आलं आहे. वेस्ट इंडिजने हा सामना ३ रन्सने जिंकत भारतीय महिला संघाचा वर्ल्डकपमधला प्रवास थांबवला आहे.