दीपा करमरकरनं 'एशियन चॅम्पियनशीप'मध्ये उंचावली भारताची मान

भारताची जिमनॅस्ट दीपा करमरकर हिनं भारताच्या पेचात आणखी एक तुरा खोवलाय. एशियन चॅम्पियनशीप स्पर्धेत दीपानं  महिला गटात कांस्य पदक पटकावलंय.

Updated: Aug 5, 2015, 11:45 AM IST
दीपा करमरकरनं 'एशियन चॅम्पियनशीप'मध्ये उंचावली भारताची मान  title=

नवी दिल्ली : भारताची जिमनॅस्ट दीपा करमरकर हिनं भारताच्या पेचात आणखी एक तुरा खोवलाय. एशियन चॅम्पियनशीप स्पर्धेत दीपानं  महिला गटात कांस्य पदक पटकावलंय.

जपानच्या हिरोशीमामध्ये एशियन चॅम्पियनशीप ही स्पर्धा सुरू आहे. सोमवारी पार पडलेल्या स्पर्धेत चीनच्या यान वँग हिनं १४.९८८ पॉईंटस् मिळवत सुवर्ण पदक पटकावलं. तर जपानच्या सय मियाकावा हिनं १४.८१२ पॉईंटसहीत रौप्य पदक पटकावलं. दीपानं १४.७२५ पॉईंटरससहीत तिसरा क्रमांक मिळवत कांस्य पदक आपल्या नावावर नोंदवलं. 

याआधीही, दीपानं २०१४ साली ग्लासगोमध्ये झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं होतं. तसंच, यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात झालेल्या ३५ व्या 'नॅशनल गेम्स स्पर्धेत' दीपानं त्रिपुराला तब्बल पाच सुवर्ण पदकं मिळवून दिले होते. 

गेल्या वर्षी, एशियन गेम्स २०१४ मध्ये १४.२०० पॉईंटसहीत दीपानं चौथा क्रमांक मिळवला होता. मात्र, यामुळे तिचं पदक हुकलं होतं. 

दीपा ही मूळची त्रिपुराची राजधानी आगरतळा इथली... येत्या ९ ऑगस्ट रोजी ती वयाची २२ वर्ष पूर्ण करतेय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.