न्यूयॉर्क : मॅच सुरू असताना झालेल्या एका दुर्घटनेत आणखी एका ९ वर्षांच्या मुलाला आपले प्राण गमवावे लागलेत.
शनिवारी अमेरिकेच्या कैसास ही दुर्घटना घडलीय. राष्ट्रीय बेसबॉल काँग्रेस आंतरराष्ट्रीय सीरिज दरम्यान सुरू असलेल्या एका मॅचमध्ये केसेर कारलाइल या लहानग्या 'बॅटबॉय'च्या डोक्यावर बॅट लागल्यानं त्याचा मृत्यू झालाय. तो मैदानावर वस्तू आणण्याचं आणि त्यांची व्यवस्था सांभाळण्याचंही काम पाहत होता.
शनिवारी दुपारी मुलाच्या डोक्यात बॅट लागली होती. यावेळी तो सर्कलजवळ उभा होता. यावेळी त्यानं डोक्यात हेल्मेट घातलेलं नव्हतं, असं राष्ट्रीय बेसबॉल काँग्रेसनं म्हटलंय.
विचिता ईगलनं दिलेल्या माहितीनुसार, लिबरल बी जेस टीमचे व्यवस्थापक माइक कारलाइल यांनी सोमवारी केसेर कारलाइल यांच्या मृत्यूच्या बातमीला दुजोरा दिलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.