दुसऱ्या टी-20मध्ये भारताचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय, टीममध्ये एक बदल

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-20मध्ये भारतानं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.

Updated: Aug 28, 2016, 07:47 PM IST
दुसऱ्या टी-20मध्ये भारताचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय, टीममध्ये एक बदल  title=

फ्लोरिडा : वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-20मध्ये भारतानं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. शनिवारी झालेल्या पहिल्या टी-20मध्ये भारताचा केवळ 1 रननं पराभव झाला होता. त्यामुळे 2 मॅचच्या या सीरिजमधली ही मॅच जिंकणं भारतासाठी गरजेचं आहे. 

ही मॅच भारत हरला तर सीरिजबरोबरच आयसीसीच्या टी-20 क्रमवारीमध्येही भारताचा दुसरा क्रमांक जाणार आहे. या मॅचमध्ये भारतानं टीममध्ये एक बदल केला आहे. मागच्या मॅचमध्ये एका ओव्हरमध्ये 32 रन देणाऱ्या स्टुअर्ट बिनीऐवजी लेग स्पिनर अमित मिश्राला टीममध्ये संधी देण्यात आली आहे.