अश्विनचा भेदक मारा, वेस्ट इंडिज 196 धावांवर ऑल आऊट

 सबिना पार्कवर सुरू असलेल्या वेस्टइंडिज विरूद्धच्या दुस-या कसोटी सामन्यात भारताच्या भेदक गोलंदाजीपुढे विंडिज संघ ढेर झाला. 

Updated: Jul 31, 2016, 08:30 AM IST
अश्विनचा भेदक मारा, वेस्ट इंडिज 196 धावांवर ऑल आऊट title=

किंगस्टन : सबिना पार्कवर सुरू असलेल्या वेस्टइंडिज विरूद्धच्या दुस-या कसोटी सामन्यात भारताच्या भेदक गोलंदाजीपुढे विंडिज संघ ढेर झाला. 

आश्विनच्या फिरकीपुढे विंडिज संघाचा पहिला डाव 196 धावांवर आटोपला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने दिवसअखेर 1 गडी बाद 126 धावा केल्या. शिखर धवन 26 धावांवर बाद झाला. लोकेश राहूल 75 तर चेतेश्वर पुजारा 18 धावांवर खेळत आहेत. 

तत्पूर्वी नाणेफेक जिंकुन विंडिज संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला. मात्र, आर. आश्विनच्या मा-यापुढे त्यांच्या निभाव लागला नाही. अश्विनने 5, तर इशांत शर्मा आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी 2 गडी बाद केले. 

विडिंजकडून ब्लॅकवुडने सर्वाधिक 62 धावा केल्या. मार्लन सॅमुअल्स 37, तर आपला पहिला कसोटी सामना खेळणा-या मिग्वेल कुमिंसने नाबाद 24 धावा केल्या.