मिरपूर : अंडर १९ वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात भारतावर पाच विकेटनी मात करत वेस्ट इंडिजने जेतेपद पटकावले. भारताने विजयासाठी ठेवलेले १४६ धावांचे माफक आव्हान वेस्ट इंडिजने पाच विकेट आणि तीन चेंडू राखून पूर्ण केले आणि जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
वेस्ट इंडिजने सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय विंडीजच्या गोलंदाजांनी सार्थ ठरविला. विंडीजच्या गोलंदाजांनी भेदक मारा करताना भारताला ५० षटके व्हायच्या आतच गुंडाळले. भारताला ४५.१ षटकांत जेमतेम १४५ धावा करता आल्या. सरर्फराज खानने ५१ धावांची संयमी खेळी केल्याने भारताला दीडशेच्या घरात पोहोचता आले. मात्र इतर फलंदाजांनी सपशेल निराशा केली. यामुळे भारताचा डाव १४५ धावांत आटोपला.
प्रत्युत्तरादाखल वेस्ट इंडिजची सुरुवात खास झाली नाही. २८ धावांत दोन बळी गमावल्यावर त्यांनी सावध पवित्रा घेत खेळण्यास सुरुवात केली. विंडीजकडून केसी कार्टीने सर्वाधिक नाबाद ५२ धावा केल्या. त्याला कीमो पॉलने (नाबाद ४०) चांगली साथ दिली.
पाहा लाईव्ह स्कोरकार्ड