पराभवानंतर धोनीने मौन सोडले, चॅपलची री ओढली

 दक्षिण आफ्रिककडून पाचव्या आणि शेवटच्या वन डेमध्ये २१४ धावांनी पराभव मिळाल्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने पुन्हा 'प्रक्रिया'वर फोक करण्यावर जोर दिला आहे. यापूर्वी वादग्रस्त टीम प्रशिक्षक ग्रेग चॅपल यांनी अशीच भाषा केली होती. 

Updated: Oct 26, 2015, 02:20 PM IST
पराभवानंतर धोनीने मौन सोडले, चॅपलची री ओढली  title=

मुंबई :  दक्षिण आफ्रिककडून पाचव्या आणि शेवटच्या वन डेमध्ये २१४ धावांनी पराभव मिळाल्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने पुन्हा 'प्रक्रिया'वर फोक करण्यावर जोर दिला आहे. यापूर्वी वादग्रस्त टीम प्रशिक्षक ग्रेग चॅपल यांनी अशीच भाषा केली होती. 

दक्षिण आफ्रिकेच्या ४३८ धावांच्या डोंगराचा पाठलाग करताना भारतीय टीम ३६ षटकात २२४ धावांत बाद झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत धोनी म्हणाला, मला माहिती आहे. भारतात सर्वांना परिणाम पाहिजे आहे. पण ते प्रक्रियावर लक्ष न दिल्याने योग्य परिणाम मिळत नाही हे त्यांना माहीत नाही. ही कठीण परिस्थिती आहे. 

अधिक वाचा - टीम इंडियाच्या दारूण पराभवानंतर पिच क्यूरेटरवर भडकले रवी शास्त्री

या सर्व परिस्थितीवर आम्ही तोडगा काढण्याचा प्रयत्न करीत आहे. आम्हांला आणखी काही तरी नवीन करून पाहिले पाहिजे. त्यामुळे एक सारखा निकाल लागेल. दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदा भारतात वन डे सिरीज जिंकली आहे. यापूर्वी त्यांनी टी -२० मालिकाही जिंगली आहे. 

आपण सखोल विचार केला पाहिजे. तसे केले नाही तर एक दोन मालिका जिंकू.. पण सततचे चांगले प्रदर्शन पाहिजे असेल तर तुम्हांला स्थीर आणि संतुलीत संघ हवा. आमचा संघ त्यात कमी दिसतो. फलंदाजी क्रमवारीत नेहमी बदल करणाऱ्या धोनीवर टीकेची झोड उठवली जात आहे. त्यावर तो म्हणाला वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळी भूमिका आणि रणनिती आखली पाहिजे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.