मेलबर्न : भारताने विजयासाठी ठेवलेल्या ३९६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचे पाच फलंदाज तंबूत परतलेत. विराट कोहलीचे शानदार शतक आणि धवन, अजिंक्यच्या अर्धशतकांच्या बळावर भारताने तिसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी ३९६ धावांचे लक्ष्य ठेवलेय. विराट कोहलीने या सामन्यात ११७ चेंडूत शानदार ११७ धावा ठोकल्या. तर रहाणेने ५५ चेंडूत ५० आणि धवनने ९१ चेंडूत ६८ धावा केल्या. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताला पाचव्या षटकांत रोहितच्या रुपाने पहिला धक्का बसला. तो सहा धावा करुन झटपट बाद झाला. त्यानंतर विराट आणि धवनने दुसऱ्या विकेटसाठी ११९ धावांची भागीदारी संघाला शंभरपार नेले. धवन बाद झाल्यानंतर विराट आणि रहाणेची जोडी जमली. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी १०९ धावांची भागीदारी रचत संघाला अडीचशेच्या घरात नेऊन ठेवले. विराट, रहाणे बाद झाल्यानंतर मात्र खालच्या फळीतील फलंदाजांना जास्त वेळ खेळपट्टीवर तग धरता आला. अखेर ५० षटकांत सहा बाद २९५ धावा केल्या.
पाहा लाईव्ह स्कोर