इस्लामाबाद, नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमध्ये यांच्यामध्ये १९ मार्चला धर्मशाळा येथे मॅच होणार होती. मात्र, सुरक्षेचा आढावा घेऊनही ही मॅच होणार की नाही, याबाबत स्पष्ट करण्यात आलेले नाही. रात्री उशिरा पाकिस्तान शिष्टमंडळाने आम्ही सरकारची परवानगी घेणार आहे. त्यांनी जर ती दिली तर मॅच होईल, असे स्पष्ट केलेय. त्यामुळे मॅचवर अनिश्चिततेचे सावट आहे.
दोन देशांतील सामन्याच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी पाकिस्तानातून दोन सदस्यांनी काल सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. त्यानंतर पथकाने या सामन्याला हिरवा कंदील दिला होता. त्यानंतर रात्री उशिरा सांगण्यात आले, आम्ही सरकारच्या निर्णयाचा विचार करतोय. सरकारने जर निर्णय दिला तर सामना होईल, असे पाकिस्तानकडून स्पष्ट करण्यात आलेय. त्यामुळे सामन्यावर अजून सावट कायम आहे.
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांनी मागच्या आठवडयात भारत-पाकिस्तान सामन्याला सुरक्षा देण्यास असमर्थता दाखवली होती. त्यामुळे सामन्या बाबत साशंकता होती. धर्मशाळाचे जिल्हाधिकारी आणि पोलीस महानिरीक्षक यांनी पाकिस्तानच्या या २ सदस्यांना पूर्ण सुरक्षा देण्याची हमी दिली. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सुद्धा पाकिस्तानी संघाच्या सुरक्षेसाठी निमलष्करी दलाची पथके तैनात करण्याचे आश्वासन दिले
.
स्पर्धेचे संचालक एमव्ही श्रीधर यांनी गृहमंत्रालयातील अधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर भारत-पाकिस्तान सामना नियोजित वेळापत्रकानुसारच होईल असे स्पष्ट केलं होतं. मात्र, पुन्हा एकादा पाकिस्तानने खोडा घालण्याचा प्रयत्न केलाय.