धर्मशाला : धर्मशाळा टेस्टमध्ये मिळवलेल्या विजयामुळे भारतानं सीरिजवरही ताबा मिळवला. उल्लेखनीय म्हणजे, ही सीरिज दोन कॅप्टन्सच्या नेतृत्वाखाली खेळण्यात आली. सुरुवातीच्या तीन टेस्टमध्ये विराट कोहली भारताचा कॅप्टन होता... परंतु, दुखापतीमुळे त्याला शेवटची टेस्ट खेळता आली नाही... त्यामुळे कॅप्टन्सीची संधी अजिंक्य रहाणेला मिळाली... आणि भारतानं या शेवटच्या मॅचमध्ये विजय मिळवला. या मॅचमध्ये भारतानं ऑस्ट्रेलियाला ८ गडी राखून पछाडलं.
पण, भारतीय क्रिकेटच्या इतिहासात ही काही पहिलीच वेळ नाही... जेव्हा एकाच सीरिजमध्ये टीम इंडियाला दोन कॅप्टन्स मिळाले... यापूर्वीही, एका सीरिजमध्ये भारताचे दोन कॅप्टन्स दिसले होते... आणि त्यांनी सीरिजही जिंकल्या होत्या...
- २०१० मध्ये बांग्लादेशविरुद्ध वीरेंद्र सेहवागनं धोनीच्या अनुपस्थितीत एका टेस्टमध्ये कॅप्टन्सीची धुरा आपल्या खांद्यावर घेतली होती... त्यानंतर पुन्हा एकदा धोनीचं आगमन झालं आणि त्यानं कॅप्टन्सी आपल्या ताब्यात घेतली... ही सीरिज भारताच्याच नावावर आहे.
- २००८ सालीही ऑस्ट्रेलियाविरुद्ध महेंद्र सिंग धोनी आणि अनिल कुंबळेच्या कॅप्टन्सीमध्ये भारतानं सीरिजवर कब्जा मिळवला होता. या सीरिजमध्ये कुंबळेनं निवृत्ती स्वीकारली होती... त्यानंतर धोनीनं भारताची धुरा आपल्या हातात घेतली होती.