मुंबई : निवड समिती सोमवारी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड करणार आहे. खेळाडूंची निवड करतांना थकलेल्या खेळाडूंना आराम देता येईल का यावरही विचार करण्यात येणार आहे. यासाठी दुसऱ्या दर्जाची टीम इंडिया दौऱ्यावर पाठवली जाणार आहे, टीम इंडियाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीला देखिल आराम दिला जाणार आहे.
टीम इंडियाचा बांगलादेश दौऱ्यावर दारूण पराभव झाला. टीम इंडिया मागील सात महिन्यांपासून लगोपाठ क्रिकेट सामने खेळतेय. निवड समितीही अशावेळी युवा खेळाडूंना संधी देण्याच्या विचारात आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टेस्ट कॅप्टन वीरेंद्र सहवाग आणि स्पिनर आर. अश्विनला देखिल आराम दिला जाऊ शकतो.
१० जुलैपासून सुरू होणाऱ्या या मालिकेत रोहित शर्मा आणि सुरेश रैना कर्णधारपदाचे दावेदार असतील.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर वर्ल्डकप आणि आयपीएल हे धोनीसाठी सर्वात मोठं ओझं होतं, यानंतर श्रीलंका टेस्ट सामन्यासाठी कोहली, अश्विन आणि धोनीला आराम आवश्यक असल्याचं म्हटलं जात आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.