नवी दिल्ली : पासपोर्ट प्रकरणावरुन चर्चेत आलेले आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनी आता भारतीय क्रिकेटपटूंवर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप केला आहे.
भारतीय क्रिकेट संघातल्या दोन महत्त्वाच्या खेळाडूंची ललित मोदींनी नाव घेतलं आहे. सोबतच वेस्ट इंडिजच्या एका खेळाडूचंही त्यांनी नाव घेतलं आहे.
या तिघांना एका बड्या भारतीय रिअल इस्टेट व्यापाऱ्यानं लाच दिल्याचा आरोप, ललित मोदी यांनी केला आहे. त्याची माहिती आयसीसीचे सीईओ यांना जून 2013 मध्येच दिली होती, असंही ललित मोदी यांनी म्हंटलंय.
आयसीसीला लिहिलेल्या त्या पत्रामध्ये आपण त्या तिन्ही क्रिकेटपटूंची नावं नमूद केल्याचंही ललित मोदी यांनी सांगितलंय. त्या बड्या रिअल इस्टेट व्यापाऱ्यानं, तिघांना रोख आणि वस्तू स्वरुपात भेटी दिल्याचं ललित मोदी यांचं म्हणणं आहे. पीटीआय वृत्तसंस्थेनं ही माहिती दिली आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.