झिम्ब़ॉम्वेच्या टेलरची शतकी अन् रेकॉर्डब्रेक खेळी...

वर्ल्डकपच्या 'ग्रुप बी'च्या शेवटच्या महायुद्धात शनिवारी सुरू असलेल्या भारत आणि झिम्बॉम्वे मॅच दरम्यान झिम्बॉम्वेच्या ब्रँडन टेलरनं आपल्या शानदार खेळाचं प्रदर्शन केलंय. सोबतच, त्यानं काही रेकॉर्डसही आपल्या नावावर केलेत. 

Updated: Mar 14, 2015, 11:35 AM IST
झिम्ब़ॉम्वेच्या टेलरची शतकी अन् रेकॉर्डब्रेक खेळी...  title=

नवी दिल्ली : वर्ल्डकपच्या 'ग्रुप बी'च्या शेवटच्या महायुद्धात शनिवारी सुरू असलेल्या भारत आणि झिम्बॉम्वे मॅच दरम्यान झिम्बॉम्वेच्या ब्रँडन टेलरनं आपल्या शानदार खेळाचं प्रदर्शन केलंय. सोबतच, त्यानं काही रेकॉर्डसही आपल्या नावावर केलेत. 

या सामान्यात झिम्बॉम्वेनं भारतासमोर २८८ रन्सचं टार्गेट समोर ठेवलंय. यामध्ये टेलरनं ११० बॉल्समध्ये १३८ रन्स ठोकलेत. यामध्ये, त्याच्या  १४ फोर आणि ५ सिक्सचा समावेश आहे. या खेळीसोबतच टेलर झिम्बॉम्वेचा आजवरचा तिसरा सर्वात यशस्वी बॅटसमन बनलाय. 

झिम्बॉम्वेसाठी सर्वात जास्त रन्स करणाऱ्या अॅन्ड फ्लावर (६७८६ रन्स) आणि ग्रान्ट फ्लावर (६५७१ रन्स) नंतर टेलरचा क्रमांक लागतोय. 

याशिवाय, कॅप्टन म्हणून ब्रॅंडन टेलर जगातील दुसऱ्या नंबरचा कॅप्टन बनलाय ज्यानं वर्ल्डकपमध्ये सलग दोन मॅचमध्ये शतकी खेळी केलीय. ब्रँडनपूर्वी केवळ रिकी पॉन्टिंग हा कारनामा करण्यात यशस्वी झालाय.

तसंच, आजच्या शतकी खेळीसोबत टेलर झिम्बॉम्वेसाठी सर्वांत जास्त म्हणजेच ८ शतक ठोकणारा बॅटसमनही बनलाय. त्यानं आज एलिस्टेयर कॅम्पबेलचा ७ शतकांचा रेकॉर्ड तोडलाय.

इतकंच नाही तर टेलर या वर्ल्डकपमध्ये ४०० रन्स बनवणारा झिम्बॉम्वेचा पहिलाच बॅटसमन ठरलाय. यापूर्वी, झिम्बॉम्वेसाठी एका वर्ल्डकपमध्ये सर्वात जास्त ३६७ रन्सचा रेकॉर्ड नील जॉन्सनच्या नावावर होता. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.