आयसीसी वर्ल्डकपसाठी भारतीय महिला संघ क्वालिफाय

कर्णधार मिताली राज आणि सलामीवी मोना मेशराम यांच्या शानदार खेळीच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघाने वर्ल्डकपच्या क्वालिफायरमध्ये प्रवेश केलाय. 

Updated: Feb 18, 2017, 08:23 AM IST
आयसीसी वर्ल्डकपसाठी भारतीय महिला संघ क्वालिफाय title=

कोलंबो : कर्णधार मिताली राज आणि सलामीवी मोना मेशराम यांच्या शानदार खेळीच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघाने वर्ल्डकपच्या क्वालिफायरमध्ये प्रवेश केलाय. 

बांगलादेशला नऊ विकेटनी हरवत भारतीय संघ आयसीसी वर्ल्डकप स्पर्धेसाठी पात्र ठरलाय. भारताने टॉस जिंकत बांगलादेशला पहिल्यांदाच फलंदाजीचे निमंत्रण दिले. बांगलादेशने ५० षटकांत ८ बाद १५५ धावा केल्या. भारतासाठी हे आव्हान तितकेसे मोठे नव्हते. 

मिताली राजने नाबाद ७३ आणि सलामीवीर मोनाने नाबाद ७८ धावांची दमदार खेळी साकारताना बांगलादेशला ९ विकेटनी हरवले. या विजयासह भारत २४ जून ते २३ जुलैदरम्यान इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्डकप स्पर्धेसाठी क्वालिफाय ठरलाय.